को-हाळे बु (दि६) बारामती शहरासह तालुक्यात पावसाने आज जोरदार हजेरी लावली. जवळपास २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने उच्चांक गाठला होता. तसेच पाऊसही दोन दिवस झाले हुलकावणी देत होता . मात्र आज संध्याकाळी ८ वाजता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे . मात्र दोन दिवसांच्या उकाड्यातुन नागरिकांना मुक्ती मिळाली असून आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . आज बारामती शहरासह पणदरे, को-हाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर, सोमेश्वर, थोपटेवाडी , लाटे यासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
बारामती शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार बॅटींग . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment