बारामती(दि६) बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज बारामतीमध्ये ८४ कोरोना रुग्ण आढळून आले असून यामध्ये ग्रामीण भागातील ५१ रुग्ण असून शहरामध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात कोरोना झपाटय़ाने पसरत असल्याने प्रशासनामार्फत बारामती तालुक्यात सोमवार पासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास जनता कर्फ्यू सुद्धा वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
कालचे प्रतीक्षेतील 87 जणांच्या अहवाला पैकी शहरातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत व 82 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 258 पैकी पॉझिटिव्ह- 32,निगेटिव- 105, प्रतीक्षेत-119 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -38 पॉझिटिव्ह-20 निगेटिव्ह 28 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले 106 नमुने पैकी पॉझिटिव्ह- 32 निगेटिव्ह 74 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत 84 रुग्ण झाले असून शहरमध्ये 33 व ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळून आले आहेत . एकूण बारामतीची रुग्णसंख्या 1372 झाली असून बारामतीमध्ये एकूण मृत्यू 45 झाले आहेत. एकूण बरे झालेले रूग्ण संख्या 595 झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment