बारामती दर्पण     
पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथील ओंकार संजिवन गायकवाड (वय २५) हा युवक रविवार दिनांक २६ रोजी नीरा डावा कालवा या ठिकाणी मित्रांसमवेत पोहायला गेला होता.काही वेळाने पोहणाऱ्या सहका-यांना ओंकार कालव्यामध्ये दिसून न आल्याने  
   त्यांनी आरडाओरडा करत शोधाशोध सुरु केली. या वेळी तरबेज पोहणार्यांनी कालव्यात उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही.पाटबंधारे विभागाला या घटनेची माहिती देऊन सुद्धा कालवा बंद करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. मात्र  आज सकाळी सात वाजता घटनास्थळापासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर या युवकाचा मृतदेह आढळून आला.कालव्यामध्ये  स्थानिकांनी टाकलेल्या जाळीला हा मृतदेह अडकल्याचे दिसून आले. लॉक डाउन असल्याने पुणे परिसरातून हा युवक गावी आला होता.त्याच्या पाठीमागे आई वडील व मोठा भाऊ असा परिवार असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post