बारामती येथिल एकूण रुग्णांच्या संपर्कातील काल घेतलेल्या नमुने पैकी उर्वरित 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील 2 व व ग्रामीण जगातील 3 असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून 12 जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे. यामध्ये बारामती शहरातील आमराई परिसरातील 59 वयाची महिला व पंचवीस वर्षाचा तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे तर मेखळी येथील साठ वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील 29 वर्षे वयाचा तरुण व वानेवाडी येथील 34 वर्षांची महिला पॉझिटिव आलेली आहे.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment