बारामती तालुक्यातील रुग्णांच्या  संपर्कातील काल जे नमुने घेतलेले होते त्यामधील उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून 67 वर्षीय पुरुष कसबा बारामती येथील रहिवासी आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.सकाळी पवईमाळ येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.आता कसब्यातील दुसरा व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बारामतीतील प्रशासनाने कडक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post