कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
बारामती तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कोऱ्हाळे बुद्रुक गावात सोशल distancing अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य राम भरोसे आहे.
    कोऱ्हाळे बुद्रुक तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे गावात नेहमीच मोठी गर्दी असते.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन वाढवत 3 मे पर्यंत नेले आहे. मात्र बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात लॉक डाउन बाबत लोक गंभीर नसल्याचे चित्र आहे. गावात किराणा मालाच्या दुकानासमोर अक्षरशः जत्रा भरावी अशी गर्दी होत आहे. तालुक्यातील अनेक लोक गावात खरेदी करण्यासाठी येत आहेत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतेच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गर्दीला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाशी लढण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेताना दिसताहेत मात्र दुसरीकडे त्यांच्याच तालुक्यात ग्रामीण भागात मात्र लॉक डाउन बाबत नियमांचा भंग करताना दिसत आहेत. त्यामुळे जर गावातील लोकांना कोरोनाची बाधा झाली तर ग्रामपंचायत प्रशासन याची जबाबदारी घेणार का हा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post