माळेगाव प्रतिनिधी-
अपंग व मतिमंद असलेली सात वर्षीय भाग्यश्री कृष्णा वाकोडे या चुकलेल्या मुलिस अवघ्या पाच तासात तिच्या पालकाकडे स्वाधीन केल्याने पोलिस नाईक रमेश नागटिळक व काॅन्स्टेबल अमोल खांडेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सात वर्षीय अपंग व मतिमंद असलेली भाग्यश्री ही चालत कृषी केंद्राच्या जवळ पोहचली होती.या मुलिस ताब्यात घेऊन पोलिसांनी स्टेशनमधे आणली.याबाबत सोशल मिडीयावर संदेश प्रसारीत करण्यात आला.पोलिसांनी तिची विचारपुस करत पालका बाबत माहिती मिळवली व ति फक्त नावच सांगत होती.अखेर हे आवाहन पेलुन तिच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिस यशस्वी झाले.
यावेळी शारदानगर येथील धुमाळ नर्सरीत काम करणा-या शारदा वाकोडे या महिलेस ओळख पटवून भाग्यश्रीला ताब्यात दिले. आपली मुलगी सापडल्यामुळे आईला अश्रू अनावर झाले होते.तिने तिला पोटाशी कवटाळले व पोलिस बांधवांचे आभार मानले.
अवघ्या पाचच तासात मुलीला आईकडे स्वाधीन केल्याने पोलिस नाईक रमेश नागटिळक व पोलिस काॅन्स्टेबल अमोल खांडेकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.अनेकांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment