बारामती दर्पण
माळेगाव प्रतिनिधी-
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांना ऋषी गावडे मित्र परिवाराच्या वतिने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.
माळेगाव येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.या पार्श्वभूमीवर गावात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.ग्रामस्थांनी बाहेर पडु नये यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यात येत आहे.
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांना ऋषी गावडे मित्र परिवाराच्या वतिने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. स्वतः ऋषी गावडे हे चहा व नाष्ट्या पोलिसांना देत आहेत.यावेळी प्रशांत मोरे,दादा जराड,युवराज जेधे उपस्थित होते.
दरम्यान शिवनगर येथे बंदोबस्त करण्यासाठी तैनात पोलिस बांधवांना भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रमोद तावरे यांनी पोहे,उपीट,शिरा आदी पदार्थ नाष्ट्यासाठी देत आहे.ऋषी गावडे व प्रमोद तावरे यांचे पोलिस बांधवांनी आभार मानले आहेत.

Post a Comment