माळेगाव प्रतिनिधी- दि२९
माळेगाव व परिसरात कोरोना रुग्णाचा आकडा वाढल्याने सोमवार (दि.31 ऑगस्ट) पासुन आठ दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन जाहिर करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली आहे.
माळेगाव व परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे.दि.16 ऑगस्ट पासुन आजपर्यंत हा आकडा तेविसच्या घरात गेला आहे. त्यामुळे गावात लाॅकडाऊन करावे असा सुर ग्रामस्थ व व्यापारी वर्गात होता.
गावात एकाच दिवशी दहा कोरोना रुग्ण आढळून आल्याने ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी उपसरपंच अजित तांबोळी,सर्व सदस्य,आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून खबरदारीचा उपाय म्हणून लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सर्व गावात रिक्षा फिरवून दंवडी देण्यात आली.
याबाबत ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे म्हणाले की ,31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2020 असा आठ दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन ची अंमलबजावणी केली जाईल. तसेच मेडिकल व दवाखाने तपासणी लॅब वगळून भाजी मंडई,सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णता बंद ठेवण्यात आले आहेत. लाॅकडाऊनमधे नियमांचे उल्लंघन करुन दुकाने उघडी ठेवणा-या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच विनाकारण फिरणा-या व मास्क न वापरणा-या ग्रामस्थांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
Post a Comment