माळेगाव प्रतिनिधी- दि२९
कोरोनामुळे साध्या पध्दतीने मोहरम सणा निमित्त मानाच्या चार ताबुतांची स्थापना केली असून हिंदु मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी सामुहिक प्रार्थना करुन ऐकीचे दर्शन घडविले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक सण साजरा करण्यावर निर्बंध घातले गेले आहेत. मोहरम हा सण देखील शासनाच्या आदेशानुसार साजरा करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या सणानिमित्त गुलाब फकीर ,अजित तांबोळी(पेठकर ताबुत),शार्गिद शेख मुलाणी(मस्जिद ताबुत),हिंदु बांधव किसन कामठे या मानाच्या चार ताबुंताची भक्तीमय वातावरणात स्थापना करण्यात आली.
यावेळी पहिल्या मानाचा गुलाब फकीर यांच्या ताबुताची पुजा उपसरपंच अजित तांबोळी व पोलीस हवालदार आबा ताकवणे यांनी केली.यावेळी हिंदु मुस्लिम बांधवांनी कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी सामुहिक प्रार्थना केली.यावेळी गुलाब फकीर,पोलीस काॅन्टेबल नितिन चव्हाण,विश्वास भोसले,संजय वाघमारे, शार्गिद शेख,सुनिल कामठे, शाहरुख शेख उपस्थित होते.
शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार ताबुतांची स्थापना केली असून यावर्षी ताबुतांच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पेठकर ताबुताचे मानकरी व उपसरपंच अजित तांबोळी यांनी दिली.
Post a Comment