बारामती दर्पण प्रतिनिधी 
 पुणे : पुण्यात ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवारचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने याच प्रकरणातला आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोमकरचा मुलगा क्लासवरून नेमका घरी आला होता, त्यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
                 पुणे शहरात गणरायाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे. संध्याकाळी आरतीची लगबग मंडळात सुरू होती. पण अचानक नाना पेठ परिसरात गोळीबाराचा आवाज आला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकरच्या मुलावर गोळ्या झाडल्या. ३ गोळ्या आयुषला लागल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
                पोलिसांनी माहिती दिली की, आयुष गणेश कोमकर हा क्लास वरून तो घरी येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसमानी हल्ला केल्याची शक्यता आहे. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. मयत आयुष हा वनराज आंदेकर याचा भाचा होता. आयुष हा क्लास वरून घरी येताना त्याच्या घराखाली बेसमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या ६ टिम्स तैनात करण्यात आल्या आहेत. वनराज आंदेकर याची झालेली हत्या आणि आत्ताच्या घटनेचा काही संबंध आहे का या दृष्टीने ही तपास सुरू आहे. या घटनेत ज्याचा सहभाग असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला सोडला जाणार नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
   
४ दिवसांपूर्वी प्लॅन फसला
पण, ४ दिवसांपूर्वी म्हणजे, १ सप्टेंबर रोजी आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने एक प्लॅन रचला होता. पण या पोलिसांनी याची कुणकुण लागली. पोलिसांनीही सगळ्यांवर नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा डाव हाणून पाडला. त्याचं घडलं असं की, कृष्णा आंदेकरने रुमसाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली अन् घरं पाहिली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.                      

वनराजची का केली होती हत्या
उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केली होती. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post