बारामती दर्पण प्रतिनिधी 
 फलटण :
 फलटण तालुक्यातील ढवळ येथे बारामती येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे कृषीदूत अथर्व कुंभार , वेदांत भापकर,विश्वास कोळपे,शिवराज लकडे, निखिल निमसे,आयुष फराटे, यश भोसले, सार्थक भगत या विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ढवळ गावात ऊस पिकावरील लोकरी मावा कीड नियंत्रणावर चर्चासत्र घेतले. या चर्चा सत्रामध्ये गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये लोकरी मावाचे सांस्कृतिक, रासायनिक व जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करायचे याबद्दल उपाययोजना सांगितल्या व ते नाही केल्यास पिकाचे किती नुकसान होते याची कल्पना उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. संतोष मोरे (ADR) व प्राध्यापक शरद दळवे सर यांच्या मार्गदर्शनातून विशेष सहकार्य मिळाले. व या चर्चासत्रातून ढवळ गावामध्ये ऊस लोकरी मावा बद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित कृषीदुतांनी लोकरी मावा, कीड नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसलन केले.

Post a Comment

أحدث أقدم