बारामती दर्पण प्रतिनिधी :
 बारामती:
श्री एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंत मान्यवरांना राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीही कला,क्रीडा, विज्ञान,वाणिज्य, कृषि,उद्योग, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांना राज्याचे कॅबिनेट कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये बारामती तालुक्यातील पणदरे येथील जावल सिद्धनाथ गोंधळी पथकाला राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून पथकातील सदस्य अमोल पवार पणदरे, मंगेश शिंदे, अमोल पवार तामखडा , विकास शिंदे बाळासो जाधव इत्यादी कलावंत यावेळी सहभागी होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनामध्ये समाज भूषण महादेव जी शिंदे साहेब, निवृत्त आयुक्त मुंबई महानगर पालिका तसेच उज्जैन महाकाल भक्त डॉ धुमाळ महाराज संस्थेचे अध्यक्ष सुप्रिया सावंत,एस एस सावंत सर, विश्वस्त श्रीराम सावंत, असे विविध मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची स्थापना करत असताना गोंधळी समाज त्यावेळी बहिर्जी नाईक यांच्या समवेत सांकितिक भाषेत हातवारे करून महाराज गनिम आलाय किंवा महाराज गनिम निघालाय असे गुप्तहेर विभागात उल्लेखनीय कामगिरी  करत होता. सिद्धनाथ गोंधळी या पथकाने आजपर्यंत विविध ठिकाणी म्हणजेच विधान भवन , भीमथडी , इंद्रायणी थडी , अशा विविध ठिकाणी आपली लोक कला देवांची पूजा अर्चा करून तसेच पारंपरिक जागरण गोंधळ कला अजुन पर्यंत जिवंत ठेवली आहे हे पथक पारंपरिक लोक कला जपण्याचे व प्रसार करण्याचे कार्य करीत आहे.या पुरस्कारामुळे या पथकाची मान उंचावली असून पथकावर विविध क्षेत्रातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم