बारामती दर्पण प्रतिनिधी :
कोऱ्हाळे बुद्रुक : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयात, 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. सतीश खोमणे, स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य नंदकुमार मोरे, को-हाळे गावचे सरपंच रवींद्र खोमणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश माळशिकारे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन खोमणे विद्यालयाचे प्राचार्य थोरात सर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व सर्व सेवक वर्ग यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील अभिरूप धारण करून आले होते. लेझीम, नृत्य, झांजपथक, दिंडी, टिपऱ्या नृत्य,ढोल ताशाच्या गजरामध्ये कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा यावेळी काढण्यात आली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कर्मवीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गोड स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व सेवकांनी परिश्रम घेतले.
Post a Comment