बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वर नगर:
बारामती तालुक्यातील नींबूत येथे शर्यतीच्या बैलाच्या खरेदी वादातून गोळीबार झाला आहे. या घटनेने बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेत बैलाचा पूर्वाश्रमीचा मालक रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले असल्याची माहिती असून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या गौरव काकडे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. बैलाच्या व्यवहारातून हा गोळीबार झाला असून, गौरव काकडे याने स्वतःकडे पिस्तुलातून गोळीबार केला असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक माहिती नुसार, चार- पाच दिवसांपूर्वी गौतम काकडे त्यांना बैलगाडी शर्यतीतील ट्रिपल महाराष्ट्र केसरी असे संबोधले जाते. त्यांनी सुंदर नावाचा बैल फलटणच्या रणजीत निंबाळकर यांच्याकडून घेतला होता. त्याच्या मुलाखती ही गाजत होत्या. ज्यांच्याकडून बैल घेतला होता ते रणजीत निंबाळकर एक अकॅडमी चालवतात. त्यांचे आणि काकडे यांचे घरगुती संबंध असल्याचे बोलले जात आहे.
काल रात्री रणजीत निंबाळकर हे निंबुत मध्ये आले होते. बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून त्यांच्यात चर्चा झाली. खडाजंगी झाली आणि त्यानंतर त्याचे वादात रूपांतर झाले. काकडे यांच्या पिस्तुलामधून गौरव काकडे याने थेट निंबाळकरांवर गोळी झाडली यात निंबाळकर गंभीर जखमी झाले.
या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली निंबाळकर यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांनी तातडीने हालचाली करत यातील आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.
Post a Comment