इंदापूर :
उजनीच्या भीमापात्रात परवा संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली आणि या बोटीबरोबर सहा जण बुडाले व एक जण बचावला होता. त्यांना शोधण्यासाठी काल सकाळपासून मोहीम सुरू झाली होती तब्बल 36 तासानंतर पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून लॉन्च द्वारे संध्याकाळी सहाच्या दरम्यान इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे निघालेली लॉन्च अचानक वादळी वाऱ्यात सापडली आणि या वादळी वाऱ्यात लॉन्च उलटली. याच्यामध्ये दोन लहान मुलांसह तब्बल सहा जण बेपत्ता झाले होते, तर एक जण स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे या घटनेत आश्चर्यकारकरीत्या बचावलेले आहेत.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. घटना
घडल्यापासून लागलीच बचाव करायला सुरुवात
झाली मात्र रात्र झाल्यामुळे थांबवली होती काल
सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एनडीआरएफ चे
पथक या ठिकाणी बचाव कार्यात सहभागी झाले. ते
दिवसभर सहभागी होते. परंतु काल दिवसभरात
काहीही हाती लागले नाही.
आज पहाटेच्या वेळी पाच मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. ते पाच मृतदेह एनडीआरएफ चे पथक ताब्यात घेणार असून इतरांचाही शोध सुरू आहे. दरम्यान घटना घडल्यापासून बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक नदी काठी थांबून होते.आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी एकच हंबरडा फोडला.
Post a Comment