बारामती दर्पण प्रतिनिधी 
बारामती :
 बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.यावेळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं सांगतले ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचं नमूद केले.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी ते काम नक्की करेन असं सांगतानाच मी जे काम हाती घेते ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.

तसेच उंडवडी सुपे येथे प्रचार सभा आटोपल्यावर बारामतीकडे निघाल्या असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांना दिला. तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही जेष्ठ नागरिक आले होते. त्यांच्याशीही सुनेत्रा वहिनी यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post