बारामती दर्पण प्रतिनिधी:
कोऱ्हाळे बुद्रुक:

बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तरडोली येथे सुरू असलेल्या सागर जाधव यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून कोराळे बुद्रुक ते तरडोली अशी दुचाकी रॅली काढत जाहीर पाठिंबा दिला आहे. 
  तरडोली येथे उपसरपंच  व युवा शेतकरी सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर ४२ रुपये हमीभावा सहीत विविध मागण्यांसाठी आमरण  उपोषण  सुरू केले आहे.  यापूर्वी केलेल्या  उपोषणानंतर शासना मार्फत आश्वासन देऊनही  ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा  उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून तालुक्याच्या विविध भागातून दूध उत्पादक शेतकरी तरडोली येथे उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर करत आहेत. कोराळे बुद्रुक पंचक्रोशीतही मोठा दूध उत्पादक शेतकरी वर्ग आहे. सागर जाधव यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून  कोराळे बुद्रुक पंचक्रोशीतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोराळे बुद्रुक ते तरडोली अशी दुचाकी रॅली काढत जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सागर जाधव यांना पाठिंबा म्हणून लवकरच कोऱ्हाळे बुद्रुक मध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post