बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील युवा दूध उत्पादक अविरत संभाजी पानसरे यांच्या गाईची बेंगलोर के.पी. डी.एफ. ए. मध्ये दूध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या गाईला तब्बल ६ लाख ५१ हजार रुपयाची किंमत देवून खरेदी करण्यात आली आहे. या गाईला महाराष्ट्रात सर्वात जास्त  किमतीने खरेदी केले असल्याचे बोलले जात आहे. 
कर्नाटक प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मिंग असोसिएशनचे प्रमुख पृथ्वी गोवडा आणि रघु रविचंद्र यांनी फार्मला भेट देऊन या गाईची पाहणी करून ही विक्रमी किंमत करून खरेदी केली आहे. एवढी विक्रमी किंमत मिळाल्याने युवा दूध उत्पादक अविरत पानसरे यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. अविरत पानसरे यांचा बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे 32 गायींचा गोटा आहे. या गोठ्यामध्ये 54 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाईंचा समावेश आहे. सहा लाख 51 हजार रुपये एवढ्या विक्रमी किमतीला काही खरेदी झाल्याने अविरत पानसरे यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. अविरत पानसरे यांनी एग्रीकल्चर अँड डेअरी डिप्लोमा चे शिक्षण घेतले असून गेली दहा वर्षापासून आधुनिक तंत्राचा वापर करून चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करीत आहेत. सध्या दिवसाला चारशे लिटर दुधाचा ते पुरवठा करत आहेत. स्पर्धेसाठी खरेदी केलेली गाय नवीनच व्यायली असून सध्या ती ५० लिटर दूध देत आहे मात्र ती गाय दहा दिवसातच साठ लिटर पर्यंत जाईल अशी अपेक्षा पानसरे यांनी व्यक्त केली आहे. अविरत पानसरे हे येत्या काही दिवसात शंभर गाईंचा फार्म उभारण्याचे काम हाती घेणार असून या यशात संपूर्ण कुटुंबाचा तसेच मित्र परिवाराचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी साप्ताहिक बारामती दर्पण शी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment

أحدث أقدم