बारामती दर्पण प्रतिनिधी:
वडगाव निंबाळकर:
 बारामती तालुक्यातील वानेवाडी येथिल जबरी घरफोडी तसेच असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोढवे गावातील मरीमाता मंदीरातील धाडसी  चोरीची घटना ताजी असतानाच आज पहाटे पुन्हा करंजेपुल व शेंडकरवाडी या ठिकाणी चोरट्यांनी रमाकांत गायकवाड व  त्यांचे बंधू यांच्या घरी जबरी घरफोडी करून  70 हजारासह सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चार-पाच दिवसातली ही तिसरी जबरी चोरी असून यामुळे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडगांव निंबाळकर पोलीस अशा घटना गांभीर्याने घेत नाही का..?, सर्वसामान्य माणसाने कसे जगायचं असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
मागील चार पाच दिवसांपूर्वी वानेवाडी येथिल भोसले कुटुंबियांच्या घरी चोरट्यांनी जबरी चोरी करत जवळपास १० लाखांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना ताजी असतानाच मोडवे येथील मरी माता मंदिर मधील  १३  लाख ३० हजारांचे चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना (दि.२१) रोजी रात्री दीड ते अडीच वाजता घडली आहे.सदर घटने नंतर भाविकांसह ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
      या चोरीबाबत मंदिराचे व्यवस्थापक सिताराम भाऊ जाधव (रा.मोढवे ता.बारामती) यांनी फिर्याद दिली असून बारामती तालुक्यात मोढवे येथे श्री मरीमाता देवीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे.या ठिकाणी आषाढ महिन्यात मोठी यात्रा भरते. या मंदिरात २५ ते ३० वयोगटातील चोरट्यांनी मंदिरातील १७ किलो वजनाचे  ११ लाख ९० हजार किंमतीचे चांदीच्या मखराचे पार्ट ,२ किलो वजनाचा १ लाख ४० हजारांचा चांदीचा टोप  असा १३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी (दि.२१) रोजी रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास चोरुन नेला. यानंतर मंगळवारी रात्री चोरट्यांनी करंजेपुल शेंडकरवाडी या ठिकाणी गायकवाड यांच्या घराला लक्ष केले. त्यामुळे आता ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या चोरट्यांना लवकर गजाआड करावे असे मत सामान्यनागरिक व्यक्त करू लागले आहेत. 
    

वडगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह...
    वडगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या वाणेवाडी (भोसले वस्ती) येथे दि.१७ रोजी तीन भावडांची घरे एकाच वेळी फोडून चोरट्यांनी ९ लाख ६० हजारांची धाडसी चोरी केली.यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा मंदिरात जबरी चोरी झाली आहे. ही घटना ताजी असतानाच करंजेपुल शेंडकरवाडी या ठिकाणी गायकवाड यांच्या घरावर आता दरोडा टाकला आहे. या घटनेतून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Post a Comment

أحدث أقدم