बारामती दर्पण प्रतिनिधी
माळेगाव:
  बारामती तालुक्यातील माळेगाव येथील गणेशभक्त दत्तात्रय दिनकर जाधव व एक अनोळखी इसमाचे तरडोली ता.बारामती येथे दि.१८ रोजी पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याने ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
  अत्यंत दुर्दैवी व मनाला चटका लावणाऱ्या अपघाताची माहिती अशी की,माळेगाव कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार व देवांच्या भक्तीची आवड असणारे दत्तात्रय (बाळासाहेब) दिनकर जाधव (वय ६५, रा.मारुती मंदिर शेजारी , माळेगाव बु ता.बारामती) हे जुपीटर कंपनीची दुचाकी क्र.(एम.एच.४२ ए.टी.५९९१) पहाटे साडेतीन दरम्यान घरुन द्वारयात्रा निमित्ताने मयुरेश्वर मंदिर मोरगाव येथे देवाला पाण्याने अंघोळ घालायला चालले होते.
  पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान तरडोली ता.बारामती येथे अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच एका अनोळखी इसमाचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याने दोन जण या अपघात मृत्यूमुखी झाले आहेत.
 जाधव यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तिन विवाहित मुली,सुन, नातवंडे असा परिवार असुन उद्योजक अमर जाधव यांचे ते वडील होते.
     दरम्यान मयुर संजय जाधव रा.माळेगाव बु ता.बारामती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल केला असून अपघाताचा तपास सुपे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم