बारामती दर्पण प्रतिनिधी
राहुल पानसरे:

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री.सतीश मामा खोमणे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मा.श्री नंदू आबा मोरे,  कोऱ्हाळे  गावचे सरपंच रवींद्र खोमणे, उपसरपंच आबा पडळकर, कोऱ्हाळे गावचे पोलीस पाटील शरदराव खोमणे, पत्रकार सोमनाथ लोणकर, विद्यालयाचे प्राचार्य थोरात ए. बी., तसेच यावेळी विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते.जयंतीच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. थोरात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.  फेरीमध्ये दिंडी नृत्य, लेझीम व टिपरी  नृत्य विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी सादर केले. या फेरीमध्ये महापुरुषांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. गावातील ग्रामस्थांनी तसेच गुरुदत्त तरुण मंडळ या सर्वांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गावातील सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. अतिशय उत्साहामध्ये प्रभात फेरी व फेरीमधील कार्यक्रम साजरे झाले. विद्यालयाचे प्राचार्य थोरात ए. बी. विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी त्याप्रसंगी उपस्थित होते.  

Post a Comment

أحدث أقدم