बारामती दर्पण प्रतिनिधी
मोरगाव:
बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे आजची सकाळ तीन शाळकरी मुलांसाठी जीवघेणी ठरली. एका कारने उडवल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार नजिक घडली. शाळेत नेहमीप्रमाणे निघालेली तिन्ही मुले रस्त्याने निघाली असता बारामती मोरगाव रस्त्यावर मोरगाव कडून बारामतीकडे निघालेल्या (एम एच २४ सी ८०४१) या चारचाकीने जोरदार धडक दिली.
भरधाव वेगातील या चारचाकी गाडीने शाळेला निघालेल्या तीन शाळकरी मुलांना धडक दिली. या धडकेत रुपेश अमोल खांडेकर व ओंकार संतोष खांडेकर या दहावीत शिकणाऱ्या दोन मुलांचा मृत्यू झाला.
या घटनेत संस्कार संतोष खांडेकर हा विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान यावेळी बारामतीत होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदोबस्तावर निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून ओंकार खांडेकर रुपेश खांडेकर व संस्कार खांडेकर या तिघांनाही बारामतीत आणले.
त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु दरम्यान ओंकार आणि रुपेश यांचा मृत्यू झाला होता. तर संस्कारला बारामतीतील गिरिराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले.
Post a Comment