बारामती दर्पण प्रतिनिधी 
मोरगाव:
बारामती येथे पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाच्या शुभम विकास जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
      बारामती तालुक्याच्या शालेय कुस्ती स्पर्धा बारामती येथील कुस्तीगीर संघात पार पडल्या. यावेळी शुभम जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. याच विद्यालयातील शंभूराजे तात्यासाहेब कुतवळ याने ४२ किलो वजन गटात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला. 
   यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळू बालगुडे, संतोष जेधे यांनी मार्गदर्शन केले. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, सचिव भारत खोमणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी होळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post