बारामती दर्पण प्रतिनिधी:
को-हाळे बुद्रुक:
स्वर्गीय भगत बापू तसेच प्रदीप बापू धापटे यांचे वडील तुकाराम धापटे यांच्या काळात गावातील सिध्देश्वर हायस्कूलच्या इमारतीसाठीच्या निधीसाठी ग्रामपंचायत सदस्य पदाची बोली लावून इमारतीचं काम पूर्ण करत ग्रामपंचायत बिनविरोध केली होती आणि त्याच शाळेत शिक्षण घेवून आज गावातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत. असे मत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील तात्या भगत यांनी व्यक्त केले.
प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप, व्हॉइस चेअरमन प्रणिता ताई खोमणे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, माजी बांधकाम सभापती प्रमोद काका काकडे,माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, युवा नेते रविराज तावरे,लालासाहेब माळशिकारे,विलास भगत,लालासाहेब नलवडे,सरपंच रवींद्र खोमणे, डी.एम खोमणे,डॉ.गायकवाड,उद्योगपती संजय निकम, डी.जी. माळशिकारे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारती सतीश खोमणे(उपविभागीय कृषी अधिकारी), कुणाल खोमणे (मंडळ कृषी अधिकारी), पूजा पवार (मुंबई शहर पोलीस), दिगंबर तोरणे (पुणे शहर पोलीस), औदुंबर तोरणे (मुंबई शहर पोलीस) अबोली माळशिकारे (mht cet 100%) , स्वामी गाडेकर गुरव (NEET:665/720) चिन्मयी गाडेकर गुरव (NEET:576/720) या यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच प्रताप काका धापटे यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या यशाचे श्रेय आई वडील तसेच शिक्षकांना दिले. प्रताप काका धापटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, शासकीय काम करत असताना शेतकरी तसेच सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम केले. बांधकाम विभागात काम करत असताना गावच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली. गावातील लोक आजही भेटल्यावर ऋण व्यक्त करतात आणि ते एक वेगळंच समाधान असतं असंही त्यांनी सांगितलं. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
إرسال تعليق