बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती:
     जिल्ह्यातील माजी सैनिकांचे शासकीय पातळीवर असणारे प्रश्न मार्गी लावुन जिल्ह्यात फिरते कॅंटीन ,रुग्णालये याबाबत चे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यावर भर देणार असुन यासाठी नियमीत बैठका घेणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस डी हंगे यानी बारामती येथे व्यक्त केले .
      बारामती येथे तहसीलदार गणेश शिंदे व आजी , माजी सैनिक यांचे उपस्थीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना ,निवृत्ती वेतनाची थकीत प्रकरणे ,शौर्यपदक धारक वीर पत्नी व सैनिकांची  जमीनीची अतिक्रमणाची प्रकरणे तत्काळ निकाली काढणेसाठी आयोजीत शासनाच्या आदेशानुसार आज बारामती तहसीलदार कार्यालयात बैठक पार पडली.सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार शेळके, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ सोमेश्वर नगर चे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड. गणेश आळंदीकर ,सैनिक महाउद्योग चे संस्थापक  अनिल शिंदे ,प्रशांत शेंडकर ,जय जवान जय किसान संघयनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर,बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा शिंदे ई पदाधिकारी वर्गासह अनेक माजी सैनिक यावेळी हजर होते .
       बारामती मधील रुग्णालयात    सैनिकासाठी असलेल्या योजना वापरात येत नसल्याची तक्रार तसेच सी एस डी कॅंटीन नसल्यामुळे होणारी गैरसोय दुर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कर्नल हंगे यानी सांगीतले व आपण नियमीय सर्व जिल्ह्यात याबाबत बैठका घेणार असलेचे ते म्हणाले .कल्याण अधिकारी सुभेदार शेळके  यानी  बचत गटाच्या विविध योजनांची माहीती यावेळी दिली .
      तहसीलदार गणेश शिंदे यानी सांगीतले सरसकट समस्या जरी मला सोडवता आल्या नाही तरी सातबारा उतारे तत्सम अडचणी अथवा बांधावरच्या रस्त्याच्या अतिक्रमणासारखे माजी सैनिकांचे विषय आपण   प्राधान्याने मार्गी लावु असे सांगीतले .
     जमीनीसबंधातील तक्रारी च्या फाईल्स तहसीलदार शिंदे यानी जमा करुन घेवुन अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवुन मार्गी लावु असे आश्वासन त्यानी यावेळी दिले .
       बारामती तालुक्यातील सैनिक संघटनाचे काम चांगले असल्याचे यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल एस डी हंगे यानी सांगितले.
    यावेळी हनुमंत निंबाळकर,अनिल शिंदे ,ॲड गणेश आळंदीकर ई.नी आपल्या मनोगतामधे त्यांच्या  संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post