बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वरनगर:
सोमेश्वर नगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयाचा विद्यार्थी सुजल सावंत यांने धावण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत 3000 मीटर प्रकारात दुसरा तर 5000 मीटर धावण्याच्या प्रकारात तृतीय स्थान पटकावले सुजल हा मु.सा काकडे महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे नुकत्याच बालेवाडी येथे महाराष्ट्र अथलेटिक्स महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यात सुजलने घवघवीत यश संपादन केले. आता तामिळनाडू येथे 28 एप्रिल ला होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी दोन्ही प्रकारात त्याची निवड झाली आहे मांढरदेवी अथलेटिक्स फेडरेशनचे राजगुरू कोथळे यांनी त्याला मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे व प्राचार्य देविदास वायदंडे आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे साहेब, गणेश आळंदीकर व विकास सावंत यांनी त्याचे अभिनंदन केले सुजलचे या यशाने परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post