बारामती दर्पण प्रतिनिधी 
पिंपळी:
हिंदुस्थान कॅटल फिड्स व वैष्णवी डेअरी पिंपळीच्या वतीने पिंपळी-लिमटेक,ढेकळवाडीसह इंदापूर तालुक्यातील अकरा प्राथमिक शाळांना सुमारे चार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
पहिली ते सातवी पर्यंतच्या प्राथमिक शाळेतील विध्यार्थी व विद्यार्थिनींना दोन ते पाच वह्यांचे सेट वाटप करण्यात आले.
कॅटल फिड्स व वैष्णवी दूध डेअरी पिंपळीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक पिंपळी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नंदा शिंदे मॅडम, लिमटेक शाळेचे मुख्याध्यापक बजरंग जाधव सर व ढेकळवाडी शाळेचे मुख्याध्यापक अजित गावडे सर यांनी केले.
तसेच सरपंच मंगल हरिभाऊ केसकर व बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण यांनी वह्या वाटप हा उपक्रम स्तुत्य असा असून कॅटल फिड्स व वैष्णवी डेअरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपला वाढदिवस,पुण्यस्मरण व महापुरुष जयंतीनिमित्त विधायक कार्य म्हणून शाळेसाठी विधायक उपक्रम राबवावेत असे मनोगत व्यक्त केले.
वह्या वाटपानंतर विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.
यावेळी पिंपळी गावचे सरपंच मंगल केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते, बारामती तालुका सोशल सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,कॅटल फिड्स सेल्स विभागाचे महेश यादव, वैष्णवी डेअरी पिंपळीचे चेअरमन नवनाथ देवकाते,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण, हरिभाऊ केसकर,श्रीमती हौसाबाई घोरपडे विद्यालयाचे क्लार्क दत्तात्रय बनकर सर, पिंपळी आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक राहुल घुले,पिंपळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव केसकर,शिक्षिका नंदा शिंदे,उज्वला पाटील, कांचन रणपिसे,अनिता काळखैरे तसेच पिंपळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल बनकर, बाळासो बनसोडे, रघुनाथ देवकाते पिंपळी लिमटेक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक विध्यार्थी त्याचप्रमाणे ढेकळवाडी याठिकाणी ढेकळवाडी गावचे उपसरपंच राहुल घुले,मा. सरपंच नाना घुले, शाळेचे मुख्याध्यापक अजित गावडे सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित घुले, व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन घुले तसेच विध्यार्थी व शिक्षक-शिक्षिका आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post