बारामती दर्पण प्रतिनिधी:
थोपटेवाडी:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावात शिवप्रेमींनी प्रतापगड किल्ल्यावरून पायी शिवज्योत आणत शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी केली.
   थोपटेवाडी गावात शिवछत्रपती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे दरवर्षी शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते. सालाबाद प्रमाणे यावर्षी प्रतापगडावरून पायी शिवज्योत  
आणत तसेच संध्याकाळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची ट्रॅक्टर ट्रॉली मधून भव्य मिरवणूक काढत शिवजयंती साजरी करण्यात आली. नुकतेच सैन्य दलातून निवृत्त झालेले थोपटेवाडी गावचे सुपुत्र अमोल घोरपडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मोठी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मिरवणुकी वेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. गावातील शिवप्रेमींनी वाजत गाजत काढलेली ही मिरवणूक अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी कुमारी उत्कर्षा विनोद नलवडे हिने या मिरवणुकीत सामील होत शिवाजी महाराजांची गारद दिली. या मिरवणुकी वेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार महेंद्र फणसे साहेब उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post