बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारे व भगत कुटुंबियांनी विवाहदीनी मुर्टी मोडवे येथील यशवंतराव मोरे आश्रम शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना अन्नदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी कोऱ्हाळे बुद्रुक येथील कल्याण सुरेश माळशिकारे यांची कन्या सेजल आणि याच गावातील राजेंद्र विश्वास भगत यांचे चिरंजीव रोहित यांचा विवाह   सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडला. या दोन्हीही कुटुंबीयांनी अनेक वायफट खर्चाला फाटा देत विवाह कार्य पार पाडले. विवाह कार्याला सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माळशिकारे व भगत कुटुंबीयांनी लग्न समारंभात बनवलेल्या स्नेहभोजनातील दोनशे विद्यार्थ्यांचे जेवन प्रथम मूर्टी येथे आश्रम शाळेत पोहच केले आणि मगच पाहुणे व मान्यवरांसाठी स्नेहभोजन सुरू केले. त्यांच्या या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी ही स्वागत केले. तसेच मुर्ट्टी येथील आश्रम शाळेतील प्राध्यापकांनी माळशिकारे व भगत कुटुंबियाचे आभार मानत नवदाप्त्यास शुभेच्छा दिल्या. खरंतर आज-काल विवाहात मोठा बडेजाव करत भरपूर पैशाची उधळपट्टी केली जाते. एका दिवसाच्या विवाह कार्यक्रमासाठी एवढा मोठा खर्च करून दहा- दहा वर्ष कर्ज फेडणारी कुटुंबे आपण पाहिली आहेत. अशा कुटुंबीयांसाठी माळशिकारे व भगत कुटुंबीय आदर्श आहेत हे मात्र नक्की.

Post a Comment

Previous Post Next Post