बारामती दर्पण प्रतिनिधी:
थोपटेवाडी:
थोपटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 4 रोजी उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनाने झाली. शेतकरी गीत, कोळीगीत, एकच राजा, आदिवासी गीत, लावणी नृत्य अशा विविध नृत्यावर बाल चिमुकल्यांनी उपस्थित पालक व नागरिकांनाही गाण्यावर ठेका धरायला भाग पाडले. पालकांनीही बालचीमुकल्यांच्या कलेला दाद देत त्यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोपटेवस्ती व अंगणवाडी यांच्या समुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संपत जराडे होते. तसेच यावेळी अजित वि.का. सोसायटीचे चेअरमन नानासाहेब थोपटे, सोमेश्वर चे संचालक रणजित मोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी थोपटे, सरपंच रेखा बनकर,ग्रा.सदस्य संतोष खांडेकर,सुनील अण्णा गायकवाड, पोलीस पाटील नितीन थोपटे, सागर मोरे, तुषार थोपटे, योगेश थोपटे, सचिन थोपटे, गणेश थोपटे, महानवर सर, अशोक माळशिकारे सर ,शिवदत्त भोईटे, चंद्रकांत पाटोळे, प्रविण सोणवने, तसेच गावातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळाव्यवस्थापन समिती थोपटेवस्ती, अंगणवाडी सेविका रंजना साळवे तसेच गणेश तरुण मंडळी थोपटेवाडी यांनी केले होते.
Post a Comment