बारामती दर्पण प्रतिनिधी:
सोमेश्वरनगर:
      बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व वडगाव निंबाळकर पोलीस यांच्यात आज  रविवारी झालेल्या क्रिकेट मॅच मधे पोलीसानी ३५ धावानी पत्रकार संघावर दणदणीत विजय मिळवला. विजयाची ट्रॉफी उद्योजक दिपक साखरे यांचे हस्ते  पोलीसाना देण्यात आली .
      वडगाव निंबाळकर चे स पो नी सोमनाथ लांडे  यांची बदली झाल्याने त्यांच्या काळातील दरवर्षी होणारी क्रिकेट मॅच आज त्यांच्या व नवीन आलेल्या स .पो. नि. सचीन काळे व पत्रकार संघाचे कप्तान महेश जगताप संतोष शेंडकर ,हेमंत गडकरी यानी नाणेफेक पत्रकारानी जिंकल्यावर गोलंदाजी चा निर्णय घेतला. पत्रकार संघाने केलेल्या गोलंदाजी मधे  पोलीसानी  पोलीस उपनिरिक्षक सलीम शेख यांच्या दमदार फलंदाजीने आठ ओव्हर मधे १०० धावा केल्या . पत्रकारानी त्याचा पाठलाग करताना  दोन बाद ६५ धावा पर्यंत मजल मारली .पी एस आय योगेश शेलार यानी उत्कृष्ठ यष्टिरक्षण केले .पोलीसांच्या वतीने ए पी आय सोमनाथ लांडे ,ए .पी .आय सचीन काळे ,पी एस आय सलीम शेख ,पी एस आय योगेश शेलार ,सागर चौधरी ,देशमाने ,साळुंखे मेजर ,नाळे मेजर ,आबा जाधव ,धुमाळ ,तुषार जैनक ,मार्कंड ,सागर ,नागटिळक ,दिपक वारुळे ईत्यादी खेळले तर पत्रकारांच्या वतीने सचिन वाघ व अमर वाघ यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. महेश जगताप ,संतोष शेंडकर ,हेमंत गडकरी ,युवराज खोमणे,गणेश आळंदीकर ,मनोहर तावरे ,दता माळशिकारे ,संतोष भोसले ,सोमनाथ लोणकर ,विनोद गोलांडे ,तुषार धुमाळ ईत्यादी खेळले .
  विजेत्याना साखरे उद्योग समुहातर्फे  दिपक  साखरे,ॲड नवनाथ भोसले यांचे हस्ते मानचिन्ह देण्यात आले पत्रकारांच्या वतीने महेश जगताप ,गणेश आळंदीकर व हेमंत गडकरी यानी मनोगत व्यक्त करताना आमचे काही खेळाडू जखमी असल्याने अपयश आल्याचे व सोमनाथ लांडे साहेबाना त्यांच्या उत्कृष्ठ कार्यकाळाची भेट असल्याचे सांगीतले तर ए पी आय सोमनाथ लांडे यानी माझ्या वडगांव निंबाळकर येथील कार्यकाळात ईथले पत्रकार खऱ्या अर्थाने पत्रकारितेबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याने मैत्रीचे नाते निर्माण झाले ते कायम स्मरणार राहील असे ते म्हणाले . नवीम ए पी आय सचीन काळे यानी यापुढे ही असेच मैत्रीपूर्ण सबंध राहतील क्रिकेट मधे विजय आमचा झाला नसुन विजय खेळाचा झाला आहे असे सांगत पत्रकाराना भविष्यात विजेता होण्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

Previous Post Next Post