बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांची बदली एटीएस पुणे ग्रामीण ला झाली असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन काळे हे वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचा नव्याने कारभार पाहणार आहेत.
    २०१९ पासून सोमनाथ लांडे हे वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचा कारभार पाहत होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला अधिकारी म्हणून राहण्याचा मान सोमनाथ लांडे यांना मिळाला आहे.   त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हाचा तपासांची उकल केली आहे. सामाजिक कामातही ते नेहमी अग्रेसर होते. कोरोना काळात जिल्ह्यातील सर्वात मोठे रक्तदान शिबिर त्यांच्याच काळात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला राबवण्यात आले होते. त्यांच्या या कार्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कौतुक केले होते. तसेच कोरोना काळातही अनेक गरिबांना त्यांनी मदतीचा हात दिला होता.तसेच त्यांच्याच कार्यकाळात सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गौरवण्यात आले.
याव्यतिरिक्त महेश विधाते यांची बारामती पोलीस ठाणे वरून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, योगेश लंगुटे यांची बारामती पोलीस ठाणे वरून इंदापूर पोलीस ठाण्याला बदली करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post