बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी संघटनांनी बारामतीत शुक्रवारी (दि. (२३) ऊर्जा भवनसमोर आंदोलन केले. अदानी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकारक्षेत्रातील वीज कंपनी समांतर नवीन लायन्स स्थापित आशिया खंडातील सर्वांत मोठी कार्यक्षम गडगंज एक हजार कोटीपेक्षा मोठी कंपनी असून, केंद्र सरकारने जास्त महसूल मिळविणाऱ्या कंपनीच्या एकूण कार्यक्षमता व मुंबई ,पनवेल, उरण, ठाणे, मुलुंड, भांडुप, क्षेत्रातील जवळपास पाच लाख वीज ग्राहक महावितरण कडून अदानीकडे हस्तांतरित होण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करत परवाना मागितला आहे. त्यामुळे भविष्यात खाजगी दावणीला वीज ग्राहक बांधले जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी असून केंद्र सरकारने कंपनीच्या कारभाराचा विचार करून अनेक पारितोषिके जाहीर केली आहेत. ज्या महावितरण कंपनीने २०२१-२२ मध्ये १३५ कोटी रुपयांचा नफा कमाविला अशा कंपनीच्या महसुलाचा उच्चांक असलेली वा ज्या ठिकाणी कृषी ग्राहकच नाही असा प्रदेश खासगीकरणासाठी निवडला आहे. या कृतीला समितीतील सर्व संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला.
महावितरण कंपनी नफा राज्यांच्या हितासाठी विकासासाठी वापरते. अदानीकडून जास्त नफा कमविण्याचा प्रयत्न होईल, असा आरोप करण्यात आला. कृषी ग्राहकांच्या सवलती बंद होतील. शेतकरी, दुर्बल घटकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल. आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले. यावेळी बारामती इंटक संघटनेचे सुरेश देवकर,संयुक्त कृती समिती बारामतीचे दत्तात्रय माहूरकर, ज्ञानेश्वर सावंत, धनाजी तावरे, जैनुद्दीन अतार, राजेंद्र देहाडे, संतोष पवार, राजेंद्र झिंजाडे, धनंजय गावडे, रवींद्र चौधरी आदीसह कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा मोर्चात सहभाग होता.
Post a Comment