बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वरनगर:
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.
    सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षिका शर्मिला सय्यद गेली अनेक वर्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना विविध भेटवस्तू देतात. मागील वर्षी त्या सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. यावर्षी त्यांनी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे टिफिन बॉक्स दिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एम  साळुंके, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. जमदाडे, एस. यु. सोरटे, एस. आर. वाबळे, एम. एस. कुतवळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post