बारामती दर्पण प्रतिनिधी;
मोरगाव:
गुरुवार दिनांक 1/12/2022 रोजी मौजे सायंबाची वाडी तालुका बारामती येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. यावेळी श्रमदान करण्यासाठी अस्मिता ग्राम संघाच्या महिला सर्व सद्यस , अध्यक्ष तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल मॅडम व तालुक्यातील सर्व महिला कृषी सहाय्यक प्रोत्साहन पर श्रमदाना साठी उपस्थित होत्या . तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व सर्व महीला कृषी सहाय्यक यांच्या मदतीने तृप्ती गुंड मॅडम यांनी सर्व महिला व शेतकऱ्यांना एकत्र आणून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम पूर्ण केले . कृषीमैत्रीण रोहिणी इंगळे , मनोहर भापकर, बाळासाहेब झणझने , महिला वर्ग तसेच इतर ग्रामस्थ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
Post a Comment