बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
महाराष्ट्रातील सत्ता बदलल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातील व्यक्तींच्या विधानामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. यात भरीस भर म्हणून ५० खोके घेतल्याच्या आरोपावर शिंदे सरकारचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक 8 रोजी सकाळी ९:३० वाजता बारामतीतील भिगवण चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.अब्दुल सत्तार यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रभर सर्वत्र निषेधाचे पडसाद उमटू लागले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सत्तारांना जीभ हासडुन ठेवण्याचा इशारा दिला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post