बारामती दर्पण प्रतिनिधी:
वडगाव निंबाळकर:

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून रेशनिंग चा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून  विकणाऱ्या दुकानदारास व ट्रक चालकाला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. संतोष जवाहरलाल शहा (वय:५१) रा. वडगाव निंबाळकर तालुका: बारामती व ट्रक चालक किशोर एकनाथ सावंत (वय४१) रा.लिंब.सातारा या दोघां विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मधून दोन लाख 66 हजार 850 रुपयांचा ३२५ नायलॉनच्या पिशव्यात असलेला माल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे यांनी या दोघांना विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३(१)(२)(d)(e), ७(१)(a)(ii) यानुसार गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती येथे रवाना केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post