बारामती दर्पण प्रतिनिधी
दौंड:
दौंड पाटस मार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकी वरील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. मृत युवक हे काष्टी गावातील होते.या अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावावर शोककळा पसरली आहे..ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे .
या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ,ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर दौंड शुगर कारखाना येथे पाटस दौंड रोडने ऊस घेऊन जात होता...या ट्रक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीने मागून धडक दिली. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. दुचाकी नंबर MH16 BP 9280 पाठीमागून धडक दिल्याने गणेश बापू शिंदे वय 25,ऋषिकेश महादेव मोरे वय 23,स्वप्नील सतीश मनुचार्य वय 24 या तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत .
Post a Comment