बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
एक नव्हे तर तब्बल 22 गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो.हवा. अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी सारख्या २२ गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे लखन ऊर्फ महेश पोपट भोसले, रा. वडगाव जयराम स्वामी, तां. खटाव, जिल्हा सातारा हा मोजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे आला आहे अशी माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सो.. मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री. गणेश इंगळे यांनी नुकताच स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्विकारलेले पो. नि. श्री. अविनाश शिळीमकर व पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री. सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स. ई. गणेश जगदाळे, अमित सिद-पाटील, पो.हवा, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल आहिवळे, सहा फौज मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. कडील पो. ना. हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, पोलीस मित्र दादा कुंभार, बारामती तालुका पो.स्टे.मधील पो. हवा राम कानगुडे, पो.ना. अमोल नरुटे, दीपक दराडे.. माळेगाव पो.स्टे.कडील पो.ना. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पो. कॉ. ज्ञानेश्वर मोरे यांची पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला असता नमुद आरोपी हा दि.१५/११/२२ रोजी मोजे घाडगेवाडी, ता. बारामती येथे एका घरासमोर उभा असल्याचे दिसून आले, तो पोलीसांना पाहताच पळू लागला तेव्हा नमुद पोलीस पथकांनी त्याचा एक कि.मी. पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपीचे विरोधात बावीस गंभीर गुन्हे दाखल असून त्यात तो फरार होता.
Post a Comment