बारामती दर्पण प्रतिनिधी
सांगली:
सांगली इस्लामपूर रोडवर ओमनी गाडी आडवी मारून ट्रक चालकांना लुटणाऱ्या आरोपींना सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच अटक केली आहे. ट्रक चालकांना लुटल्यावर सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय सिताफिने आरोपींना गजाआड केले आहे. 
                       सविस्तर हकीकत अशी की, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धिरज नेताजी वडर (वय २८) रा, वडर गल्ली इस्लामपुर ता :वाळवा जि: सांगली व भाऊ आनंदा वडर रा, वडर गल्ली इस्लामपुर ता :वाळवा, जि :सांगली हे दोघे सहा चाकी ट्रक नं एमएच ११ एम ४७७१ मधुन सांगली कडुन इस्लामपुर कडे जात होते. तुंग मिणचे मळा येथे आल्यावर सांगलीकडुन पांढ-या रंगाच्या ओमणी गाड़ी आडवी मारुन फिर्यादी धिरज वडर हा चालवत असलेला ट्रक थांबवून ओमणी मधील २ अनोळखी इसमानी ट्रक मध्ये चढून फिर्यादी धीरज नेताजी वडर व फिर्यादीचा भाऊ आनंदा वडर यास मराठीत शिव्या देऊन लाथाबुक्यानी मारहाण करुन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम व फिर्यादीचा मोबाईल चोरुन नेला होता. अशी फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे  दाखल झाली होती.
                  सांगलीचे पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिया दुदुले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील तुंग मिणचे मळा येथे झाले जबरी चोरीच्या गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील त्यांचे पथक तयार करून तुंग मिणचे मळा येथे झाले जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना दिल्या. त्याप्रमाणे सर्व पथकांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला. सदर गुन्हयाचे अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपीची माहिती घेत असताना, तपास पथकातील बिरोबा नरळे, अनिल कोळेकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सांगली इस्लामपूर रोडवर एका ट्रक चालकास ट्रक अडवून ट्रक चालकास मारहाण करुन त्याचेकडील मोबाईल व पैसे काढून घेवून ओमनी गाडीने पळून गेलेले इसम हे सर्वजन कोरेगाव ता. वाळवा गावात मगदूम गल्लीत त्यांचेकडील ओमनी गाडीसह थांबले आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळताच वरील पथकाने मगदूम गल्लीत येथे जाऊन निरीक्षण केले असता एक पांढरे रंगाची ओमनी गाडी नं. एम.एच.१० सीएन ११६७ व त्यामध्ये तीन इसम बसलेले दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्या ओमनी गाडीस घेराव घालून गाडीत बसलेल्या तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपले नावे १) स्वप्निल बाबासो कदम, (वय २१) रा. मगदूम गल्ली कोरेगाव ता. वाळवा २) अक्षय कृष्णात पाटील, (वय२६ वर्षे) रा. हनुमानमंदिर समोर कोरेगाव ता. वाळवा ३)दिपक राजाराम जाधव (वय २५ वर्षे) रा. जाधवगल्ली, बहादुरवाडी ता. वाळवा अशी सांगितली त्यांचेकडे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हयांचे अनुशंगाने विचारपूस केली असता अक्षय पाटील यांनी सांगितले की, दिपक जाधव व तो असे सांगली इस्लामपूर रोडवर तुंग मिणचे मला येथे एका ट्रकच्या ओमनी गाडी आडवी मारुन ट्रक थांबवून ट्रकमधील चालकाला व क्लिनरला मारहाण करुन त्यांचेकडील मोबाईल काढून घेतल्याचे सागितले. स्वप्नील कदम हा गाडी चालवित होता. त्यावेळी पोहेकॉ मेघराज रुपनर पचासमक्ष ओमनी गाडी झडती घेतील असता, ओमणी गाडी मध्ये एक ओपो कंपनीचा मोबाईल मिळाला, त्या ओपो कंपनीचा मोबाईल बाबत अक्षय पाटील, दिपक जाधव याचे कडे चौकशी करता, सदरचा मोबाईल हा ट्रक चालकाचा असल्याचे सागितले. त्यावेळी पोहेकॉ / मेघराज रुपनर यांनी ओपो कंपनीचा मोबाईल किमत रुपये ८०००/- रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढ-या रंगाची ओमनी गाडी नं. एम.एच.१० सीएन ११६७ किंमत रुपये ७०,०००असा एकून ७८,००० हजार रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. 
सदर गुन्हयातील वरील सर्व आरोपी व मुद्देमाल पुढील गुन्हयाचे तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post