बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १७ रोजी संस्थेच्या सभागृहात सुनील तात्या भगत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या वेळी गावातील जेष्ठ नागरिक बाळासाहेब (आण्णा) पेशवे यांनी 93 व्या वर्षात पदार्पण केल्या बद्दल त्यांचा सपत्नीक नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप उपस्थित होते.
पुरुषोत्तम दादा जगताप यांनी बाळासाहेब पेशवे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सहकारी संस्था आता चालवणे जिगरीचे काम झाले आहे. सहकारी संस्थांचा मुख्य आत्मा सभासद असून सभासदांनी जागरूक राहून सहकारी संस्था टिकवल्या पाहिजेत. सिद्धेश्वर विकास सोसायटीच्या छोट्याशा रोपटाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. भविष्यात तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून सिद्धेश्वर विकास सोसायटीचा नावलौकिक असेल असे मत जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी सुनील तात्या भगत यांनी संस्थेला बिनविरोध निवडणुकीची परंपरा असल्याचे सांगितले तसेच संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी संस्थेचे चेअरमन नंदकुमार यादव, विलास भगत , गावचे सरपंच रविंद्र खोमणे, संस्थेचे सचिव सुरेश भगत, विश्वास नाना भगत, लालासाहेब माळशिकारे ,राहूल नाझीरकर डी. व्ही माळशिकारे, शेखर खंडागळे, पोलीस पाटील शरद खोमणे तसेच सर्व सोसायटीचे संचालक व सभासद उपस्थित होते.
Post a Comment