सायरस मिस्त्री यांच्या निधनाने देशाने महान सुपुत्र गमावला

बारामती दर्पण प्रतिनिधी
मुंबई, दि. 04:  प्रसिध्द उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून भारताने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, टाटा सन्सचे माजी प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्ववाने त्यांनी वेगळी छाप उमटवली होती, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
***

Post a Comment

Previous Post Next Post