बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वरनगर:
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेश्वर कॉलेजचे परीसर, काकडे महाविदयालय,न्यु इंग्लीश स्कुल वाणेवाडी येथे विनाकारण फिरणारे १० तरुणांवर आज दिनांक ३ रोजी वडगाव निंबाळकर पोलीसांकडुन कारवाई करण्यात आली आहे तसेच निरा बारामती रोडवर विनापरवाना वाहन चालविणे, टिपलसिट वाहन चालविणे, अशा ६१ बेशीस्त वाहन चालकांवर पोलीसंनी कारवाई करून तब्बल ५२,०००/- रुपये दंड केला आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सोमनाथ लांडे सहा. पोलीस निरीक्षक, श्री योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, दिपक वारुळे सहा पोलीस फौजदार, पो. हवालदार रमेश नागटिळक, पो. हवा. खेडकर, वाहतुक विभागाचे पोलीस अंमलदार संतोष जावीर, नितीन साळवे, व निर्भया पथकाचे पोलीस नाईक धगाटे, पोलीस अंमलदार झांबरे, महिला पोलीस अंमलदार देवकाते यांनी केली आहे.
Post a Comment