बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावामध्ये धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता या शिबिराची सुरुवात होणार असून रक्तदान व मोफत डोळे तपासणी हा कार्यक्रम थोपटेवाडी येथील सावंतवस्ती या ठिकाणी गणेश मंडळाच्या समोरील प्रांगणामध्ये होणार आहे. यासाठी गणेश मंडळाने पूर्ण तयारी केली असून या शिबिराचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment