बारामती दर्पण प्रतिनिधी
माळेगाव:
  विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता परिक्षेला सामोरे जावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत विक्रमसिंह राजेजाधवराव यांनी केले.माळेगाव येथे कोरोनाचे नियम पाळुन उत्साहात परीक्षेला सुरवात झाली आहे.
      माळेगाव येथील एस.एस.एम.हायस्कुल या दहावी परिक्षा मुख्य केंद्रात परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत विक्रमसिंह राजेजाधवराव यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षण सेवा समिती सदस्य व मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश गोफणे, सुरेश निंबाळकर, विश्वास भोसले,वेब काॅम्पुटर इन्स्टिट्यूटचे संचालक विजय अडागळे, विद्यार्थी, शिक्षक,पालक उपस्थित होते.
      यावेळी माहिती देताना प्राचार्य डि.सी.धुमाळ म्हणाले की,दहावीचे एस.एस.एम.हायस्कुल हे मुख्य केंद्र आहे.या केंद्रात १०१ विद्यार्थी परिक्षा देत असुन उपकेंद्र असलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल माळेगांव येथे   ९३, तर पणदरे येथे नवमहाराष्ट्र विद्यालयात १७५ असे एकुण ३६९ विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post