बारामती दर्पण (प्रतिनिधी)
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील उंबरचारी ते सरकारी विहीर या रस्त्याचे भूमिपूजन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील तात्या भगत व गावच्या सरपंच रेखा बनकर व उपसरपंच कल्याण गावडे यांच्या हस्ते पार पडले.
या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली होती. परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीसाठी हा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जनसुविधा मधून 17 लाख रुपयांचा निधी दिला असून या रस्त्याच्या सुधारीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.
या कार्यक्रमावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
Post a Comment