बारामती दर्पण (प्रतिनिधी)
बारामती;
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत इतर मागास प्रवर्गातील उमेदवार संभाजी नाना होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची शेवटची तारीख असल्याने आज इतर मागास प्रवर्गातील उमेदवार शरद लेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने होळकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
संभाजी नाना होळकर यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजी होळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ही बारामतीतून अ वर्ग गटातून बिनविरोध निवड झाली होती. होळकर यांच्या बिनविरोध निवडीने आता बारामती तालुक्यातील दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. होळकर यांनी या आधी गावचे सरपंच पद, युवक अध्यक्ष, संजय गांधी निराधार समिती योजना अध्यक्ष, बांधकाम व आरोग्य सभापती पद, व गेली तीन ट्रम तालुका अध्यक्ष पद भूषविले आहे.
Post a Comment