बारामती दर्पण (प्रतिनिधी)
फलटण:
फलटण तालुक्यातील जिंती गावातील तांबेवस्ती येथील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाज्यापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा विषय ठरत आहे.
जिंती गावातील जयवंत तांबे यांची कन्या संजुश्री व रघुनाथ कोळपे यांचे चिरंजीव सचिन यांचा विवाह ७ डिसेंबर रोजी संपन्न झाला. दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे लग्न सराई बंद होती परंतु शासनाने लग्न समारंभसाठी काही नियम लागू करून लग्न समारंभ यंदा सुरू झाला आहे. खरं तर समाजात अनेक लग्न सोहळे होत असतात, अनेकदा आपण शाही लग्न सोहळे बघत असतो, आपल्या मुलींची हाऊस करण्यासाठी हेलिकॉप्टर मधून मुलीची एन्ट्री करत असतात किंवा बुलेट गाडी आंदण म्हणून मुलींना देत असतात.
परंतु तांबे गुरुजी यांच्या पत्नी स्वर्गीय सविता जयवंत तांबे या आपल्या मुलीसाठी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून द्यावा अशी इच्छा आपल्या पती समोर वारंवार करत असल्याने तांबे यांनी मुलीच्या कन्या दानासाठी पुणे येथून एक लाख रुपये किमतीचे पुस्तके उपलब्ध करून दिली. खरे तर यामुळे मोबाईल आणि इंटरनेट मध्ये गुरपटलेल्या आजच्या पिढीला पुस्तकांच्या वाचनाची आवड लागून पुढील येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज,शाहू, फुले डॉ, बाबासाहेब आंबेडकर व संत साहित्याची ओळख होणार आहे. त्यांच्या या कृतीतून लेक वाचवा, लेक शिकवा हा संदेश दिला जात आहे. तसेच तांबे परिवाराच्या वतीने लग्न पत्रिकेतून स्वच्छतेचा व शिक्षणाचा संदेश देण्यात आला आहे.
महापुरुषांचे चरित्र ग्रंथ(छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, आनंदीबाई जोशी),
गंगेत गगन वितळले,
बहिष्कृत भारत,
कथा-कादंबरी (मृत्यूंजय, राधेय),
अनमोल वारसा खंड १ व २.
स्पर्धा परीक्षा पुस्तके,
आत्मचरित्र पुस्तके(कृष्णाकाठ, माझे सत्याचे प्रोयोग, असामी-असामी, प्रकाश वाठा अशा प्रकारे पुस्तके कन्यादानांत देण्यात आले.
إرسال تعليق