बारामती दर्पण (प्रतिनिधी):
फलटण :-
९ डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडा येथून फलटण शहरात आलेल्या चार जणांची कोरोणा चाचणी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.त्यानंतर त्यांचे रिपोर्ट मुंबई, पुणे येथे पडताळणी साठी पाठवले असता त्यातील तिघे ओमायक्रोन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन आरोग्य यंत्रणा प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत
फलटणमधील चौघेजण परदेशातून आले होते. या चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या चौघांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली आहे का ? याबाबत ६ दिवसांपूर्वी त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या चौघांपैकी तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तोंडाला कायम मास्क लावणे, सॅनिटायझर, हँड वॉशने हात धुणे, गर्दी न करणे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे हे आवाहन प्रशासन वेळोवेळी करत आले आहे, आताही याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
إرسال تعليق